भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संभाव्य लखपती दिदी (एसएचजी सदस्यांना) प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी साखळी प्रशिक्षण पद्धत स्वीकारण्यात आली आहे. लखपती दीदी धोरण आणि बचत गटाच्या सदस्यांना लखपती दीदी बनण्यास सक्षम करण्यासाठी संबंधित विषयांवर भारतभरातील संसाधन व्यक्तींना प्रशिक्षण देणारी तज्ञांची टीम ओळखून साखळी प्रशिक्षणाची सुरुवात होईल.
संसाधन व्यक्ती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रविण (मास्टर)प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील, जे प्रामुख्याने राज्य संसाधन व्यक्ती असतील आणि राज्य एककांद्वारे निश्चित केले जातील. हे प्रविण (मास्टर) प्रशिक्षक सामुदाय संसाधन व्यक्तींना प्रशिक्षण देतील ज्यांना राज्य अभियाना मार्फत निवडले जाईल, ज्यांना ओळखल्या गेलेल्या प्रस्तावित लखपती दिदींना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असेल.