अंजना बर्मन
राज्य : आसाम
जिल्हा : बोंगाईगाव
ब्लॉक : दांगतोल
गाव : धोलागाव
स्वयं-सहायता गट : महिला स्वयं-सहायता गट
उपजीविकेचे उपक्रम : हातमाग, सुपारीची लागवड आणि कुक्कुटपालन
लखपती दीदी प्रवास
“महिला स्वयं-सहायता गटा”च्या सदस्या अंजना बर्मन यांनी विविध उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमांमध्ये स्वतःला झोकून दिले. २०१८ मध्ये, श्रीमती बर्मन यांनी पारंपारिक आसामी पेहरावाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या गटाकडून ५०,००० रुपयांचे कर्ज घेऊन हातमाग उपकरणे खरेदी केली. त्यांची उत्पादने त्यांच्या गावात आणि मित्रमैत्रिणींमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली. त्याच वर्षी, त्यांनी १.५ लाख रुपयांचे बँक कर्ज घेऊन 'जॅकॉर्ड मशीन' खरेदी केले आणि आपल्या उत्पादनाची क्षमता वाढवली.
आज त्या 'जीवन ज्योती बोवाकोटा उत्पादक गट' हा आपला उद्योग ९ जॅकॉर्ड मशीन्स आणि १ ड्रम मशीनसह चालवत असून, त्यांनी स्वयं-सहायता गटाच्या ४ सदस्यांना रोजगार दिला आहे. त्यांची उत्पादने स्थानिक आणि शहरी अशा दोन्ही बाजारपेठांत विकली जातात, ज्यातून त्यांना २,४०,००० रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. याशिवाय, श्रीमती बर्मन परसातील कुक्कुटपालनातून वर्षाला २०,००० रुपये आणि सुपारीच्या शेतीतून वर्षाला २५,००० रुपये कमावून आपल्या उत्पन्नात भर घालतात.
ही उद्योजकीय यशोगाथा केवळ त्यांच्या आर्थिक यशावर प्रकाश टाकत नाही, तर स्वयं-सहायता गटांच्या सहभागातून होणाऱ्या महिला सक्षमीकरणाचा एक जिवंत पुरावा म्हणूनही उभी आहे.