अथ्रॉन्गला
राज्य : नागालँड
जिल्हा : किफिरे
ब्लॉक : किफिरे
गाव : लाँगथॉन्गर
स्वयं-सहायता गट : कोकरी स्वयं-सहायता गट
उपजीविका उपक्रम : नागालँडमधील पारंपारिक वस्तूंचे विणकाम
लखपती दीदी प्रवास
अथ्रोंगला या नागालँडमधील किफिरे जिल्ह्यात २०१८ मध्ये स्थापन झालेल्या 'कोकरी स्वयं-सहायता गटा'च्या सचिव आहेत. अथ्रोंगला यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर तीन मुली आणि एक मुलगा अशा चार मुलांसह वैधव्याची वेळ आली. अचानक त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली.
मात्र, स्वयं-सहायता गटाचा भाग झाल्यापासून, नागालँड राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत विविध निधींतून मिळालेल्या कर्जांमुळे त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत झाली आहे. आता कमी व्याददराने कर्ज घेताना त्यांच्यात अधिक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आज त्या आपल्या सर्व मुलांना किफिरे शहरातील शाळेत पाठवत आहेत. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी विणकाम आणि घेवड्याची (beans) लागवड यांसारखे उत्पन्न मिळवून देणारे उपक्रम सुरू केले आहेत. त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे ११,००० रुपये आहे.
त्यांना असे वाटते की स्वयं-सहायता गटाचे सदस्य असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांची एक गट म्हणून असलेली ताकद होय. त्या एकमेकींना प्रेरित करतात आणि गरजूंची मदत करतात; वैयक्तिक पातळीपेक्षा एक गट म्हणून त्या खूप काही साध्य करू शकतात. त्या म्हणतात की जर महिला संघटित झाल्या आणि त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून दिली, तर त्या एक उत्तम समाज घडवू शकतात.