जी. लता
राज्य : तमिळनाडू
जिल्हा: तिरुचिरापल्ली
तालुका: उप्पिलियापुरम
पंचायत: कोट्टापालयम
स्वयंसहायता गट: रोजा महिला स्वयं -सहायता गट
उपजीविका उपक्रम : साबण, बाजरी हेल्थ मिक्स, लोणच्यांचे विविध प्रकार
लखपती दीदी प्रवास:
श्रीमती जी. लता यांनी तामिळनाडू राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे क्षमता बांधणी आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण प्राप्त केले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या व्यवसाय व्यवस्थापन कौशल्यात सुधारणा झाली.
त्यांनी घरगुती रसायने, हर्बल साबण, बाजरी हेल्थ मिक्स आणि विविध प्रकारचे लोणचे बनवण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला हा व्यवसाय मर्यादित होता आणि उत्पादनांचा वापर स्थानिक पातळीवरच होत असे. बचत गट आणि मिशनच्या कार्यकर्त्यांच्या निरंतर पाठिंब्यामुळे, त्यांनी उत्पादन वाढवले आणि उत्पादनाची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि मार्केटिंगमध्ये सुधारणा केली.
या आर्थिक मदतीमुळे त्यांना उपकरणे खरेदी करणे, कच्चा माल मिळवणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि खेळत्या भांडवलात सुधारणा करणे शक्य झाले.
त्यांनी त्यांची उत्पादन प्रणाली मॅन्युअलवरून निम-स्वयंचलित प्रक्रियांमध्ये अपग्रेड केली, ज्यामुळे सुधारित कार्यक्षमता आणि उत्पादनाची सुसंगत गुणवत्ता सुनिश्चित झाली. ब्रँडिंग, पॅकेजિંગ आणि मानकीकरणामुळे त्यांची बाजारपेठेतील उपस्थिती अधिक मजबूत झाली.
व्यवसायाचा विस्तार झाल्यामुळे, त्यांच्या कुटुंबाचे सध्याचे वार्षिक उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढून वर्षाला 5.40 लाखांपर्यंत पोहोचले आहे.
श्रीमती लता यांचा प्रवास ग्रामीण उपजीविका बदलण्यासाठी स्वयंसाहाय्यता गट आधारित हस्तक्षेप, वित्तीय समावेशन, कौशल्य विकास आणि उद्योग समर्थनाचा प्रभाव अधोरेखित करतो.