ललिता देवी
राज्य : बिहार
जिल्हा : वैशाली
ब्लॉक : गोरोल
स्वयं-सहायता गट : देवी स्वयंसहायता गट
उपजीविकेचे उपक्रम : रोपवाटिका, मध उत्पादन, मशरूम लागवड आणि शेती
लखपती दीदी प्रवास
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील गोरोल ब्लॉक येथील श्रीमती ललिता देवी या स्वयंसहायता गटांच्या परिवर्तनीय शक्तीचा एक जिवंत पुरावा आहेत. 'देवी स्वयंसहायता गटा'त सामील झाल्यावर त्यांनी एकूण १.९ लाख रुपयांचे कर्ज घेऊन रोपवाटिका, मध उत्पादन, आळंबी लागवड आणि शेती यांसारखे वैविध्यपूर्ण उपजीविकेचे साधन तयार केले. त्यांच्या धोरणात्मक गुंतवणुकीचे फळ मिळाले असून, त्यांच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न १८,००० ते २०,००० रुपयांपर्यंत वाढले आहे आणि आर्थिक स्थैर्य सुनिश्चित झाले आहे. ललिता यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यामुळे त्या 'व्हिलेज रिसोर्स पर्सन' बनल्या असून ३०० महिला शेतकऱ्यांना मदत करत आहेत. यापूर्वी, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वॉश-कम्युनिटी रिसोर्स पर्सन (WASH-CRP) म्हणून त्यांनी ३०० हून अधिक शौचालये बांधण्यासाठी गावकऱ्यांना संघटित केले, ज्यामुळे स्वच्छतेत मोठी सुधारणा झाली. ललिता यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंटमध्ये प्रशिक्षण घेतले आणि एक रोपवाटिका सुरू केली, ज्यातून पहिल्याच वर्षी १.५ लाख रुपये कमावले. त्यांनी ३० सदस्यांचा मध उत्पादन गट तयार करून आणि आळंबी लागवडीत पाऊल ठेवून आपले उत्पन्न अधिक वाढवले. ललिता एक कुशल विस्तार कार्यकर्ता बनल्या असून त्यातून त्यांना दरमहा ५,३०० रुपये अधिक प्रशिक्षण शुल्क मिळते. आपल्या एकत्रित उद्योगांतून ललिता आता दरमहा २०,००० रुपयांहून अधिक कमाई करत आहेत. त्यांचा अत्यंत साध्या सुरुवातीपासून उद्योजकतेपर्यंतचा हा प्रवास लवचिकता, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तसेच इतरांना त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सामूहिक कृतीचा प्रभाव दर्शवतो.